
समर्थाविना ना दुजा देव ध्यानी । गुणी गुंतली लेखणी आणि वाणी ।।
खुले ग्रंथ भांडार केले जयाने । नमस्कार देवास त्या आदराने ।।।। जय जय रघुवीर समर्थ ।।
श्रीरामदासी संप्रदायात श्रीसमर्थपरवाहमया देवांचे लेखन म्हणजे शेवटवा शब्द या कोटीतला आहे. श्री देवांचा कार्यकाळ आला किमान ३ विडयांपूर्वीचा झाला आहे. त्यांचे वाडमय जुने आणि कालविसंगत न होता सबैच ताजे व बालसुसंगत ठरले आहे.
शंकर श्रीकृन वेद ही महाराष्ट्राच्या जीवनातील लोकमान्य युगाची एक अनमोल देणगी आहे. त्यांच्या कहर राष्ट्रभक्तीतून यांनी समर्थ भक्ती निर्माण झाली. श्रीरामदासबोध व विष्णुशास्त्री चिपळूणकर, भास्कररावांबी निबंधमाला यांची छाप त्यांच्या वर विद्यार्थीदशेपासून होती. अखेरपर्यंत ते टिळकांचे अंतेवासी म्हणुन गणले जात.
लोकमान्यांच्या चळवळीचे लोण उत्तरमहाराष्ट्रांत पोहचविण्याचे आणि पसरविण्याचे श्रेय देवांना आहे. आपल्या सार्वजनिक आयुष्याची सुरवात देवांनी सत्कार्यात्तेजक सभेची स्थापना करुन आपल्या साथीदारांसमवेत केली. शिवाय महाराष्ट्र व महाराष्ट्र वैदिक विद्यालयाची स्थापना, श्रीशिवजन्मोत्सव. सार्वजनिक गणेशोत्सव बगैरे कार्य सुरु केले.
तरुणवयापासुनच त्यांनी राष्ट्रीय सभेच्या कार्यात रस घेतला ते जहाल पक्षात होते. १९०८ च्या गाजलेल्या सुरतेच्या आखिल भारतीय अधिवेशनाआधी महाराष्ट्राची प्रांतीक परिषद धुळयालाच झाली होती. अरविंद बाबू घोष हे देवांकडेच उतरले होते. लोकमान्यांनी आरंभीलेल्या साराबंदीच्या शेतकरी चळवळीचा देवांनी अतिशय परिणामकारक प्रचार केला.
राजवाडयांच्या परिचयातून श्रीमद्दासबोध प्रकाशनाच्या निमित्ताने सभेने एकदा जे रामदासी या प्रसिध्दीचे व संशोधनाचे व्रत घेतले. ते आजतागायत चालू आहे. त्यासाठी बडोदे मठाधिपती वादामहाराज याची किर्तने व प्रवचने त्यांनी धुळयाला४ महिने घडवून आणली. दासबोधाची प्रस्तावना ही दासबोधाच्या सुक्ष्मअध्ययनाअंती प्रसिध्द झाली व तीव्र भावनांच्या, उदा. विनोबाजी भावे अशा ताकराष्ट्रभवलांचे ते नित्यपाठीचे स्तोत्र बनले, समर्याच्या आणि संप्रदायाच्या त्यावेळी ज्ञात असलेल्या सर्व स्थानांना त्यांनी अनेकवार भेटी दिल्या, अनेक मठात कालौघात नष्ट होउन उरलेल्या हस्तलिखित ग्रंथांचे आणिकांचे संशोधन प्रदिर्घकाळपर्यंत त्यांनी केले.
इतिहासचार्य राजवाडे रुपाने महाराष्ट्रीय इतिहास संशोधनाचे केंद्र पुण्याहून धुळयाला देवांमुळे रुळले. एकनाथपूर्व कालीन ज्ञानेश्वरी, तिच्या भाषेचे व्याकरण, ऐतिहासिक सुच्या, ज्ञानेश्वरी कोश, समर्थ पूर्वकालीन काही काव्यरचना या सामग्रीच्या छपाईसाठी देवांनी आत्माराम छापखाना काढला. ताई महाराज खटल्यातील बाबामहाराजांचे दत्तकपुत्र बालवयीन जगन्नाथ महाराज यांना सांभाळण्यावी जबाबदारी टिळकांनी गोपाळराव गोगटे व भास्करराव भट यांचेवर सोपविली तर नानासाहेब देवांना विविध क्षेत्रांतील प्रत्येक व्यापात अप्पासाहेब रणदिवे यांचे सहकार्य लाभले. लोकमान्यांच्या पश्चात गांधीजींच्या चळवळीत देव सहाभागी झाले व मुंबई इलाख्याच्या कायदेमंडळांत घवघवीत बहुमताने निवडूनही आले. व विधिमंडळाचे सदस्यत्वाचे कर्तव्य त्यांनी चोखपणे पार पाडले. काही काळ देव महाराष्ट्र खादी मंडळाचे अध्यक्ष होते. १९२८ या गांधीजींचा खानदेश दौरा देवांनी आखला व पूर्ण पार पाडला, पण पुढे राष्ट्रीय सभेच्या अनुनयात्मक धोरणाशी देवांचे मतभेद होउ लागले व त्यांनी पक्षीय राजकारणातून आपले नाव काढून घेतले. व पूर्णवेळ ते समर्थाकार्याकडे वळले. घ नगरपरिषदेचे नगरसेवक १९१३ ते १९१८ याकाळात ते होते व आरोग्य व शिक्षण हे खाते सांभाळले.
ऐतिहासिक कागदपत्रातील वर्णनावरुन १९१० मध्ये देवांनी शिवथरच्या घळीचा शोध लावला सज्जगडावर श्री समर्थ संप्रदाय जार्णोध्दार मंडळ काटुन १९१८ मध्ये जमविलेल्या वर्गणीतून मठासमोरील अंगणात दगडी फरशी केली. मराठवाडातील आंबड परराज्यांतील जांब जेथे श्रीसमर्थाचे मंदिर १९३२ सा बांधण्याचा निश्चय देवांनी केला. त्यावेळी तेथे निजामाच्या राज्यात जांब गाव होते. त्यामुळे तेथे समर्थ मंदिर बांधण्याला शासनाची अनुमती मिळणे जवळ-जवळ अशक्य होते. परंतु मुंबई इलाका विधीमंडळाचे सदस्य म्हणून देवांनी सर्व पातळ्यांवर भरपुर प्रयत्न केले. व निजामांच्या दिवाणांना भेटून स्थानिक वजन मंडळींचा उपयोग करुन समर्थ मंदीर बांधकामासाठी परवानगी मिळविली. व संप्रदायाचे एक नुतन निर्माण केले. १९२६ मध्ये राजवाडे यांचे निधन झाले. त्यांचे स्मारक म्हणून धुळयास राजवाडे संशोधन मंडल स्थापनेमध्ये देवांचा सिंहाचा वाटा होता. शासनाकडून अनुदान जागा मिळविली.
मठा-मठातुन जमविलेली हजारो हस्तलिखिते आणि कागदपत्रे या राष्ट्रीय ठेव्यांचे निरंतर संस्थान उपयोग व्हावा आणि त्यांचे अध्ययन व्हावे यासाठी त्यांनी श्री समर्थ वाग्देतवा मंदिराची धुळयास १९३५ ना केली नसती मिरज सुची अशा स्वरुपाचे हस्तलिखितांचे संशोधन खंड नसून त्यात संप्रदायाचे आ मठा-मठातुन जमविलेली हजारो हस्तलिखिते आणि कागदपत्रे या राष्ट्रीय ठेव्यांचे निरंतर संरक्षण उपयोग व्हावा आणि त्यांचे अध्ययन व्हावे यासाठी त्यांनी श्री समर्थ वाग्देतवा मंदिराची धुळयास १९३५ साली स्थापना केली. नुसती मिरज सूची अशा स्वरुपाचे हस्तलिखितांचे संशोधन खंड नसून त्यात संप्रदायाचे आणि शिष्य प्रशिष्यांचे अनेक अंगानी दर्शन होते. १९४४ च्या धुळयातील साहित्य संमेलनाचे देव स्वागताध्यक्षस होते.
श्री समर्थांचे तत्त्वज्ञान पुन्हा महाराष्ट्राच्या कर्तबगारीला उधाण आणेल आणि महाराष्ट्र धर्म जाणून भारतीय राष्ट्राला, भाषेला, संस्कृतीला भाग्याचे दिवस आणेल, असा देवांचा ठाम आणि सार्थ विश्वास होता, समर्थ सेवक, कार्यकर्ते ठिक ठिकाणी निर्माण व्हावेत, म्हणून त्यांनी 'श्री समर्थ संघा'ची स्थापना केली, वर्ष सभेला स्वतःची वास्तु नव्हती देवांनी महाराष्ट्रातील जनतेचे साहाय्य मिळवून सभेच्या सभागृहाची बांधणी केली. १९५० आणि आपला हजारो ग्रंथांचा दुर्मीळ ग्रंथ संग्रह सभेला दिला.
त्यांचे थोरले चिरंजिव आणि देवांचे एकमेव प्रिय शिष्य आबासाहेब देव अत्यंत आजाराने करमात रामाज्ञा पावले आणि १९५० पुत्रशोकापेक्षा शिष्य शोकाचा कार्यनाशाचा वयोवृध्द देवांना जा बसला. देवांच्या मागे देवांच्या संस्था श्री शिवाजीराव भावे, वा.ग. गोगटे, विष्णुजी क्षिरसागर, डॉ टावकर, डॉ. चितळे आदी मंडळींनी संस्थांचे यथाशक्तीस संगोपन केले. १९७१ मध्ये देवांची जन्म शतापु मोठ्या प्रमाणात साजरी झाली. देव अतिशय प्रसिद्धीपराड़मुख होते. 'रामदासी' मासिकांवर संपादक म्हणून त्यांचे नावही छापलेले नसे. स्वत: केलेल्या सर्व गोष्टीचे श्रेय ते सभेच्या नावावर टाकीत. त्यांचे संशोधन, लेखन, वक्तृत्व, प्रचारही सारी आत्मिक उध्दारासाठी होती. आपली विद्वत्ता पाजळणे, असा मर्यादित हेतु त्यांचा लव मात्र नसे. श्री समर्थ चरणांची गोडी निर्माण झालेल्यांना देवांचे चरित्र उत्तुंग आदर्श वाटल्याशिवाय राहणार नाही.
।। जय जय रघुवीर समर्थ ।।