जय जय रघुवीर समर्थ
श्री समर्थ वाग्देवता मंदिर संकेतस्थळावर आपले स्वागत आहे.
Discover More..

श्री समर्थवाग्देवता मंदिराचे कार्य 

श्री समर्थ वाग्देवता मंदिर हस्तलिखितांचे संशोधन करणारी संस्था आहे. त्यामुळे पारंपारिक मंदिर असे त्याचे स्वरुप नाही. श्री शिव-समर्थकालीन विशाल हिन्दुस्थानात विखुरलेल्या रामदास स्वामींच्या सुमारे ११०० मठातून कष्टाने आणि प्रयासाने समर्थहृदय श्री नानासाहेब देवांनी हस्तलिखिते मिळविली. मिळविलेल्या कागदपत्रांचे संकलन, संरक्षण, संशोधन आणि प्रकाशन हे येथिल नित्योपचार आहेत. त्याद्वारे सरस्वतीची म्हणजेच वाग्देवतेची उपासना, अखण्ड ज्ञानयज्ञाप्रमाणे येथे चालू असते.

Discover
Picture1
Picture1


समर्थहृदय शंकर श्रीकृष्ण तथा नानासाहेब देव ( १८७१ – १९५८ )
समर्थाविना ना दुजा देव ध्यानी । गुणी गुंतली लेखणी आणि वाणी ।।
 खुले ग्रंथ भांडार केले जयाने । नमस्कार देवास त्या आदराने ।।
 ।। जय जय रघुवीर समर्थ ।।

समर्थहृदय श्री नानासाहेब देव

स्वातंत्र्य पूर्व काळात सैरभैर झालेल्या पराभूत वृत्तीला बांध घालून राष्ट्र प्रेरणा देण्यासाठी समर्थहृदय देवांनी सत्कार्योत्तेजक सभेच्या माध्यमातून समर्थ साहित्याच्या संशोधन कार्यास सुरुवात केली. वास्तुरुपात १९३५ साली दृग्गोचर झालेल्या या संस्थेचे कार्य १९०२ सालापासून समर्थ हृदय नानासाहेब देवांनी सुरु केले.शिव-समर्थांचे स्मरण हेच राष्ट्राचे जीवन - त्यांचे विस्मरण म्हणजे मरणच! हा सिध्दांत दृढ धरून त्यांनी संशोधन कार्य केले.

Discover

हस्त लिखितांचे संकलन, संरक्षण, संशोधन आणि प्रकाशन

या सर्व कागदपत्रांचे शास्त्रशुध्द वर्गीकरण करून ते एकेका गठ्ठ्यात - बाडात जपून ठेवले आहेत.

अशी संशोधीत बाडे सुमारे ४००० आहेत. संशोधनाच्या सुकरतेसाठी या बाडांचे १४०० छापील पृष्ठांचे ४ संशोधन खण्ड प्रकाशित झाले आहेत.

वाल्मिकीरामायण
रेखटलेले चित्र


8Feb BalpageZ5.indd

श्री समर्थ रामदासस्वामीनी वयाच्या २४ व्या वर्षी संपूर्ण संस्कृत वाल्मिकी रामायण लिहिले ते आमच्याकडे आहे.

आमचा तो हृदयाचा ठेवा आहे. त्याच्या संशोधन प्रकाशनाचा मोठा महत्वाकांक्षी प्रकल्पावर आम्ही गेली ६-७ वर्षे काम करीत आहोत.

पहिल्या बालकाण्डाचे नुकतेच प्रकाशन झाले. उर्वरीत ७ काण्डाचे काम चालू आहे. ७००० पृष्ठांचे हे प्रकाशन कार्य आहे.

प्रत्येक कागदाचे आकारमान, त्यातील ओळी, ओळीतील अक्षरे, लेखकाचा आणि लेखनकालाचा उल्लेख करून त्याची सुची बनविलेली आहे.

असे सुमारे ४.०० लक्ष कागद आहेत. त्यांचे क्षेत्रफळ सुमारे १०.०० कोटी चौ. सें.मी. आहे. समर्थ हृदय देवांनी केलेले हे कार्य विस्मयजनकच आहे.

श्री समर्थवाग्देवता मंदिराला मान्यवरांच्या भेटी 

06
15
02
10

T

08
09
03


13
07
14


12
11
05


नाडकर्णी
नाडकर्णी २
देणगी आवाहन  
Wagdevta Mandir
वास्तुच्या डागडुजीसाठी व विस्तारणीकरणासाठी 

श्री समर्थ वाग्देवता मंदिराची वास्तू जरी वणसर बांधणीची असली तरी वाढता संग्रह लक्षात घेता डागडुजी व विस्तारणीकरण आवश्यकच आहे

Donate
JOS_6899
संग्रहाची मांडणी आणि आधुनिक तंत्रज्ञानासाठी 

संग्रहाची मांडणी नव्याने करावी लागणार आहे. त्यासाठी सध्याच्या इमारतीचे विस्तारणीकरण करणे गरजेचे आहे. आधुनिक तंत्रज्ञाशी जुळवून घेण्यासाठी नवनवीन साधने उपकरणे लागणार आहेत.

Donate
JOS_6896
हे सर्व अर्थाशी निगडीत आहे.

आम्ही समर्थांचे वचन आपणापुढे ठेवतो

आपणास जे जे अनुकूल ।
ते ते करावे तत्काळ ।।

संस्थेस दिलेल्या देणग्या ८० जी कलमाखाली आयकर सवलतीस मान्य आहेत.


 
Donate